

आठल्ये महाविद्यालयात
डॉ.आंबेडकर जयंती
देवरूख : आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सिद्धी गेल्ये, सायली मोहिते, विनिता कदम व मयूरी जाधव या विद्यार्थिनींनी पाली भाषेतील गीत सादर केले. प्रा. डॉ. अमित वराळे यांनी आपल्या आजोबांच्या आठवणींच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील पैलू उलगडले. या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे तसेच, ग्रंथालय विभागामार्फत ‘सलग १२ तास वाचन’ उपक्रम आणि ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.