

माखजन येथे
संत गोरोबा पुण्यतिथी
चिपळूण ः संगमेश्वर तालुक्यातील माखजन कुंभारवाडी क्र. २ येथे श्री संत गोरोबाकाका पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी झाली. या निमित्त हरिपाठ, स्थानिक महिलांचे भजन, काकड आरती, हळदीकुंकू, सत्यनारायणाची पूजा व कीर्तने झाली. या वेळी बुरंबाड येथील कीर्तकार सचिन बुवा साठे यांचे पुण्यतिथी दिनी कीर्तन रंगले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा झाला. अध्यक्ष तुकाराम करंजेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
-----------
rat17p22.jpg-
37930
शरयू गीते
कथालेखन स्पर्धेत
शरयू गीते यांचे यश
साखरपा ः शब्दगंध साहित्य परिषदेतर्फे आयोजित राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत देवरूखच्या शरयू गीते यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांनी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली जाधव लॉन्स, कल्याण रोड येथे झालेल्या बैठकीत कवयित्री शर्मिला गोसावी, मकरंद घोडके आणि कवी राजेंद्र फंड यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. पारितोषिक विजेत्यांचा गौरव २४ मे रोजी होणाऱ्या सतराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे. विजेत्यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
------------
मानेज् इंटरनॅशनलमध्ये
अपूर्व बंदसोडे प्रथम
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव येथील मानेज इंटरनॅशनल स्कूल या सीबीएसई बोर्डाच्या शाळेचा दहावीचा निकाल जाहीर झाला. शाळेतील अपूर्व बंदसोडे (९८.८ टक्के), वर्तिक दधिच (९८.४), मैथिली ठीक (९३.८०) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. परीक्षेत तीसहून अधिक विद्यार्थ्यांनी 80 टक्क्यांहून जास्त गुण मिळवले. मुख्याध्यापिका सुमन अरोरा, शाळेचे संस्थापक रवींद्र माने, कार्याध्यक्षा नेहा माने, शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रद्युम्न माने, व्यवस्थापिका ईशानी माने यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.