

-rat17p23.jpg-
P26O37957
रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलच्या मैदानावर आयोजित कंझ्युमर्स शॉपीच्या प्रदर्शनात स्टॉलवर झालेली गर्दी.
-------------
‘कंझ्युमर्स शॉपी’चे शेवटचे दोन दिवस
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : ग्राहकाला एकाच ठिकाणी अनेक वस्तू योग्य दरात मिळण्यासाठी कंझ्युमर्स शॉपी हे गृहोपयोगी व गृहसजावटीच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री पटवर्धन हायस्कूल मैदानावर सुरू आहे. आता या प्रदर्शनाचे शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. या प्रदर्शनाला रत्नागिरी जिल्हावासीयांचा भरघोस प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संयोजिका मीनल मोहाडिकर यांनी दिली.
या प्रदर्शनात वाघबकरी चहा, टीटीके प्रेस्टिज, पितांबरी, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी, निर्लेप, बजाज, चकोर बेकरी, आरए मसाले, लक्झरी परफ्युम, नीशा हर्बल, सवाई मसाले, ऑलिव्हिया, नक्षत्र, मॅंगोसिटी, भक्ती अगरबत्ती, प्रथम पेस्ट कंट्रोल, इमरान कारपेट आदी कंपन्यांचा सहभाग आहे. पाच दिवसांच्या या प्रदर्शनात हॅंडीक्राफ्ट, ज्वेलरी, साडी, लेदर पर्सेस, लेडिज गारमेंट, लखनवी फुलकारी, गाऊन्स, टॉप्स, फूट प्रोडक्ट्स, पापड, हेल्थकेअर प्रोडक्ट, सौंदर्यप्रसाधने आदी उपलब्ध आहेत. याशिवाय वॉटर प्युरिफायर, नॉनस्टिक कूकवेअर, ओव्हन्स, सुईंग मशिन, मिक्सर, फूड प्रोसेसर, अगरबत्ती, कार्पेट्स, बेडशिट्स, लहान मुलांचे कपडे, फर्निचर, किचनमध्ये लागणाऱ्या स्टेनलेसस्टीलच्या विविध सर्व वस्तू, लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी व व्हेंटिंगमध्ये विविध डिशेस उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन १९ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत सर्वांना विनामूल्य खुले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.