

लक्ष्मी ऑर्गेनिकविरोधात
२६ ग्रामपंचायतींचा ठराव
खेड, ता. १७ : खेड वसाहतीमधील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीविरोधात स्थानिक स्तरावर आंदोलन तीव्र होत आहे. कंपनी बंद करण्याच्या मागणीसाठी आतापर्यंत ११ ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. याशिवाय आणखी २६ ग्रामपंचायतींकडूनही ठराव तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कंपनीचे प्रतिनिधी विविध ग्रामपंचायतींना भेट देऊन कंपनीमुळे कोणताही प्रदुषणाचा धोका नाही, असे पत्र मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. आंबडस गावचे सरपंच नितीन मोरे यांना भेट देऊनही अशाच प्रकारे पत्र मिळवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती त्यांनी १६ एप्रिलला झालेल्या आढावा बैठकीत ग्रामस्थांना दिली. यामुळे कंपनीकडून खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती आणि स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. नागरिकांनी अशा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.