

गॅस कंपनीच्या नावाखाली
पावणे दोन लाखांचा गंडा
सावंतवाडीतील प्रकार; सतर्कतेचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ : शहरातील सर्वोदय नगर येथील रहिवासी असलेल्या एका महिलेला आज सकाळी महाराष्ट्र नॅचरल गॅस प्रा. लिमिटेड गॅस कंपनीच्या नावाखाली आलेल्या एका बनावट फोन कॉलमधून तब्बल १ लाख ८५ हजार रुपयांचा चुना लावण्यात आला. सायबर भामट्यांनी त्यांच्या खात्यातून ही मोठी रक्कम लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
शहरातील त्या महिलेला शिंप्रे काय म्हणतात सकाळी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगून एक फोन आला. गॅस कनेक्शन किंवा बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने त्यांना काही स्टेप्स फॉलो करायला तिला सांगितले. संबंधित महिला त्या भामट्याच्या जाळ्यात अडकली ज्याप्रमाणे समोरून तिला स्टेप्स सांगण्यात आल्या त्याप्रमाणे तिने तसे केले. यादरम्यान त्यांच्या मोबाईलवर आलेली लिंक किंवा माहिती ''स्वाईप'' करताच त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ८५ हजार रुपये त्वरित डेबिट झाले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ती प्रचंड घाबरली, त्यांनी याबाबत घरातल्यांना माहिती दिली. यानंतर संबंधित घटनेची माहिती सायबर क्राईमला देण्यात आली. याबाबत संबंधित विभागाकडून चौकशी सुरू आहे. येथील पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांना या संदर्भात विचारले असता आपल्याकडे या घटनेची काहीच तक्रार आलेली नाही असे सांगितले. या घटनेनंतर सावंतवाडी नगरपालिकेचे सभापती प्रतीक बांदेकर यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कंपनीकडून अशा प्रकारे कोणत्याही ग्राहकाला अधिकृत कॉल येत नाही. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी नंबरवरून येणाऱ्या फोनवर विश्वास ठेवू नये किंवा आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.