सांडपाणी समस्या त्वरित मार्गी लावा

सांडपाणी समस्या त्वरित मार्गी लावा
Published on

38123


सांडपाणी समस्या त्वरित मार्गी लावा

प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर ः कुडाळात गटार सफाई मोहीम हाती

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः शहरातील तुंबलेली गटारे आणि सांडपाणी समस्येची नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी गंभीर दखल घेत आज स्थानिक नगरसेवक व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह शहरातील विविध भागांतील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी गटार सफाईसह तातडीने विविध उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी प्रशासनाला दिल्या.
कु़डाळ नगरपंचायतीमार्फत शहरात गटार सफाई मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष बांदेकर-शिरवलकर यांनी पानबाजार, मच्छीमार्केटसह अन्य भागांतील गटारांची प्रत्यक्ष पाहणी करीत आढावा घेतला. नादुरुस्त गटारे, सांडपाणी साचण्याच्या समस्या यावर तातडीने काम करून पावसाळ्यापूर्वी योग्य निचरा व्यवस्था सुनिश्चित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तसेच गटारांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर व सांडपाणी थेट गटारात सोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. स्वच्छता केल्यानंतर पुन्हा गटारे तुंबणार नाहीत, यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. याशिवाय मॉन्सूनपूर्व नालेसफाई मोहीम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी यावेळी दिली. प्रशासनाने कोणतीही हयगय न करता ही कामे वेळेत पूर्ण करावीत, असे स्पष्ट करण्यात आले. यावेळी नगरसेविका नयना मांजरेकर, स्वच्छता निरीक्षक श्री. नाटेकर आदींसह नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com