पिंगुळी तलावाजवळच्या बांधकामामुळे प्रदूषण

पिंगुळी तलावाजवळच्या बांधकामामुळे प्रदूषण
Published on

38126

पिंगुळी तलावाजवळच्या बांधकामामुळे प्रदूषण

गंगाराम सडवेलकर ः ग्रामस्थांसह उपोषणाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः हजारो ग्रामस्थांची तहान भागविणाऱ्या पिंगुळी पाझर तलावाच्या परिसरात आता एका विकसकाकडून बांधकामे  प्रस्तावित आहेत. त्यामुळे भविष्यात सांडपाण्यामुळे या तलावाचे पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या या तलावाकाठी बांधकामासाठी पिंगुळी ग्रामपंचायतीने ना-हरकत दाखला दिला आहे. स्थानिकांच्या जीवितास धोका पोहोचविणाऱ्या या प्रकल्पाविरोधात १ मे रोजी पिंगुळी ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी दिला आहे. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘‘पिंगुळी पाझर तलावाकाठी एका कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर बांधकामे होणार आहेत. या बांधकामामुळे सांडपाणी त्या तलावात जाऊन ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. या पाझर तलावाचा उपयोग पिंगुळी ग्रामपंचायत गेली २५ ते ३० वर्षे करत आहे. या तलावावर सुमारे १५ ते २० हजार ग्रामस्थ पाण्यासाठी अवलंबून आहेत. पिंगुळी ग्रामपंचायतीमार्फत या तलावावर नळपाणी योजना राबविली जाते. त्याचे अडीच हजार ग्राहक आहेत. असे असतानाही ग्रामपंचायतीने विकसकाला रेखांकनासाठी ‘ना-हरकत’ दिली आहे. हा तलाव जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडे आहे; मात्र या विभागाची परवानगी न घेता विकसकाकडून रेखांकन सुरू असून लघु पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष का करत आहे, असा प्रश्‍न श्री. सडवेलकर यांनी उपस्थित केला आहे. हे सगळं आर्थिक हितसंबंधांसाठी काही लोक करत असल्याची तक्रार विकसकाने लघु पाटबंधारे विभागाकडे केली आहे. अशी तक्रार दिली असेल तर लघु पाटबंधारे विभागाने या विरोधात पोलिसांकडे जायला पाहिजे होते, याकडे श्री. सडवेलकर यांनी लक्ष वेधले.
-----
...तर पावसाळ्यात माती तलावात!
रेखांकन झाल्याने तलावाकाठच्या मातीची उलथापालथ होणार आहे. ही सगळी माती पावसाळ्यात तलावात जाणार आहे. त्यामुळे तलावाची जलधारण क्षमता कमी होऊ शकते. या प्रकल्पासाठी आजूबाजूच्या झाडांची तोड झाल्याने पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच  याकडे लक्ष वेधण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थ १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत, असे श्री. सडवेलकर यांनी सांगितले. यावेळी नेरुर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, संजय गावडे, विजय नाईक आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com