गोवेरी श्री सत्पुरुष, भराडी वर्धापन दिन सोहळा आज

गोवेरी श्री सत्पुरुष, भराडी 
वर्धापन दिन सोहळा आज
Published on

38124
श्री देव सत्पुरुष
38125
श्री देवी भराडी


गोवेरी श्री सत्पुरुष, भराडी
वर्धापन दिन सोहळा आज

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः गोवेरी येथील श्री देव सत्पुरुष व श्री देवी भराडीचा वर्धापन दिन सोहळा उद्या (ता. १९) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ७ वाजता देव आणणे, ७.३० वाजता दोन्ही मंदिरांत अभिषेक, ९ वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता आरती, महाप्रसाद, ४ वाजता भाऊ नाईक यांचे सुश्राव्य कीर्तन, सायंकाळी ७ वाजता सुहासिनींच्या हस्ते देवाला औक्षण, महाआरती, रात्री ८ वाजता ग्रामस्थांची भजने, ८.३० वाजता सद्‍गुरू वारकरी दिंडी मंडळाचे (कुडाळ) भजन, १०.३० वाजता ‘श्रीं’चा पालखी सोहळा, १२ वाजता नाईक-मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन सत्पुरुष व भराडी देवस्थान समितीने केले आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com