भास्कर जाधव यांची निवड

भास्कर जाधव यांची निवड
Published on

-rat17p21.jpg-
P26O37929
भास्कर जाधव

बांधकाम कामगारांच्या सनियंत्रण
समिती अध्यक्षपदी भास्कर जाधव
चिपळूण ः महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत शासनाने स्थानिक सनियंत्रण समिती स्थापन केली आहे. गुहागर विधानसभा मतदार संघाच्या स्थानिक सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी स्थानिक आमदार भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या शिफारशीने समितीवरील अन्य सदस्यांच्या नावांना शासनाने मान्यता दिली आहे. इमारत व इतर बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण आणि त्यांना शासकीय लाभांचे प्रभावी वाटप व्हावे यासाठी शासनाने ही समिती गठित केली आहे. समितीचे सदस्य म्हणून उमेश प्रभाकर महाडिक (घाणेखुंट, ता. खेड), नदीम युसूफ काकडे (अंजनवेल, ता. गुहागर), मंगेश कृष्णा माटे (कामथे, ता. चिपळूण), साक्षी शेखर चव्हाण (मढाळ, ता. गुहागर) आणि वर्षा राजेंद्र चव्हाण (रामपूर, ता. चिपळूण) यांच्या नावांची शिफारस शासनाकडे केली होती.


कलाकार कृष्णकांत पाटील यांचा गौरव
गुहागर : आबोली सम्यक कोकण संस्थेच्या गुहागर शाखेतर्फे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ कलाकार कृष्णकांत उर्फ बाळा पाटील यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. एक ज्येष्ठ नाटककार आणि गायनकलेतील जाणकार म्हणून त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल संस्थेने ही कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘जाणता राजा’, ‘आम्ही छत्रपती शिवराय’ आणि ‘जे. के. फाइल्स’ सारख्या प्रसिद्ध नाटकांसोबतच जिज्ञासा थिएटर्सच्या ‘काळे ओठ लाल बत्ती’ या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले आहे. सत्काराला संस्थेचे अध्यक्ष कवी बी. जी. पवार, सचिव उत्तम पवार, कवी संतोष मोहिते, दीपक गमरे, मिलिंद कदम, भीमसेन सावंत उपस्थित होते.

rat17p27.jpg-
26O37989
अनुज साळवी

अनुज साळवी याचे सीबीएसई परीक्षेत यश
गुहागर ः तालुक्यातील खोडदे येथील अनुज साळवी याने सीबीएसई दहावी बोर्डाच्या परीक्षेत 96.60 टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले. राजापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातून तो उत्तीर्ण झाला. त्याचे वडील हे व्यावसायिक असून, आबलोली येथे संगणक प्रशिक्षण केंद्र चालवतात तर आई या महा ई-सेवा केंद्रचालक म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com