बांदा श्री दत्त मंदिरात विविध कार्यक्रम

बांदा श्री दत्त मंदिरात विविध कार्यक्रम
Published on

38153

बांदा श्री दत्त मंदिरात विविध कार्यक्रम
बांदा ः बांदा-लकरकोट येथील श्री दत्त मंदिराच्या कलशारोहण व पुनःप्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त २६ एप्रिलला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता नित्यपूजा, ८ वाजता लघुरुद्र, ९ वाजता दत्तयाग, १० वाजता सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा बांदा यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर, दुपारी १२.३० वाजता आरती व सामूहिक गाऱ्हाणे, १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता स्थानिक भजने, रात्री ९ वाजता शेजारती, ९.३० वाजता दत्तप्रसाद कला, क्रीडा मंडळाच्या कलाकारांचा सामाजिक नाट्यप्रयोग ‘उंबरठ्यावरी माप ठेविले’ सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी सर्व दत्तभक्तांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष सुशांत पांगम यांनी केले आहे. रक्तदान शिबिराचे उद्‍घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन श्री दत्तप्रसाद कला, क्रीडा मंडळ लकरकोट-बांदा यांच्यावतीने केले आहे.
..................
38154

परुळे येसुआका माऊलीचा रविवारी वर्धापन
म्हापण ः परुळे येथील श्री देवी येसुआका माऊलीचा तेरावा वर्धापन दिन सोहळा २६ एप्रिलला होत आहे. या निमित्ताने शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी ७ वाजता दोन गटांत रेकॉर्ड डान्स स्पर्धचे आयोजन केले आहे. खुल्या गटासाठी अनुक्रमे ७५००, ५००० व ३००० रुपये, पंचक्रोशी परुळे मर्यादित स्पर्धेसाठी ५०००, ३०००, २००० रुपये व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. शनिवारी (ता. २५) रात्री ८.३० वाजता ऑर्केस्ट्रा ‘रसिका हिट्स कोल्हापूर’ सादर होणार आहे. रविवारी (ता. २६) सकाळी ८.३० वाजता लघुरुद्र, ९.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, १ ते ३.३० महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता स्थानिक भजने, ६.३० वाजता स्वामी समर्थ महिला वारकरी भजन, रात्री ९ वाजता दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळाचा ‘वेसरोत्पत्ती’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन येसुआका देवस्थान, परुळे यांच्यावतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com