रत्नागिरीतील सर्व कामे वेळेत व दर्जेदार करणार

रत्नागिरीतील सर्व कामे वेळेत व दर्जेदार करणार
Published on

- rat१८p१६.jpg-
26O38138
रत्नागिरी ः शहरातील मारुतीमंदिर येथील निवाराशेडची पाहणी करताना पालकमंत्री उदय सामंत.
-----------
मारुती मंदिरातून शहर विकासाला गती
उदय सामंत ः रस्ते, बसथांबे होणार अधुनिक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : रत्नागिरीला महाराष्ट्रातील एक आदर्श शहर बनवण्याचे उद्दिष्ट आहे. मारुती मंदिर हे शहराचे केंद्रबिंदू असल्याने कामाची सुरुवात येथून करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल तसेच नागरिक आणि पर्यटकांसाठी अधिक स्वच्छ, सुंदर आणि आनंददायी वातावरण निर्माण होईल. सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यावर शासनाचा विशेष भर आहे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
शहरातील विकासकामांचा वेग आणि दर्जा तपासण्यासाठी आज पालकमंत्री सामंत यांनी पाहणी दौरा केला. मारुती मंदिर परिसरातील सुरू असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतानाच प्रशासनाला आवश्यक सूचनाही दिल्या. प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण, आकर्षक दुभाजक उभारणी तसेच आधुनिक प्रकाशयोजनेद्वारे रात्रीच्यावेळी शहर अधिक उजळ आणि सुरक्षित बनवण्याचा समावेश आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी जुन्या बसथांब्यांचे आधुनिकीकरण करून ते अधिक सुसज्ज आणि सुटसुटीत करण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com