खांबाळे आदिष्टी मंदिरामध्ये आजपासून धार्मिक कार्यक्रम

खांबाळे आदिष्टी मंदिरामध्ये
आजपासून धार्मिक कार्यक्रम
Published on

38161

खांबाळे आदिष्टी मंदिरामध्ये
आजपासून धार्मिक कार्यक्रम
वैभववाडी ः खांबाळे येथील श्री देवी आदिष्टी मंदिर जीर्णोद्धाराच्या २३ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त उद्यापासून (ता. १९) विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या पहाटे ५ ते ७ पर्यंत प्रातःस्मरण व काकड आरती, सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसाद, सायंकाळी ६ ते ७ पर्यंत हरिपाठ, सायंकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत भजन, ९ वाजता पालखी सोहळा, १० वाजता प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील (सोलापूर) यांचे कीर्तन, सोमवारी (ता. २०) दुपारी २.३० वाजता हळदी-कुंकू कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता पालखी मिरवणूक, रात्री १० वाजता ‘चिमणी पाखरं’ डान्स ॲकॅडमी, कुडाळ आयोजित ‘जलवा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय सोहळ्यास सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देवी आदिष्टी देवस्थान स्थानिक सल्लागार व्यवस्थापन उपसमितीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com