दापोलीतील प्रशिक्षणात ११८ शेतकऱ्यांचा सहभाग

दापोलीतील प्रशिक्षणात ११८ शेतकऱ्यांचा सहभाग
Published on

rat18p3.jpg-
38110
दापोली ः मसालापिके उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया, या विषयावरील प्रशिक्षणात सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कोकण कृषी विद्यापिठाचे प्राध्यापक.
------------

दापोलीतील प्रशिक्षणात ११८ शेतकऱ्यांचा सहभाग
दापोलीः मसालापिके उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया या विषयावरील एकदिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षणात ११८ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या वेळी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र व काळीमिरीची दोन रोपे देऊन गौरवण्यात आले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत दापोली उद्यानविद्या महाविद्यालयाची एकात्मिक फलोत्पादन विकास योजना आणि कृषी महाविद्यालयाचा कृषी विस्तार शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या वेळी डॉ. राकेश गजभिये, डॉ. नितेश दळवी, डॉ. किरण शिगवण, डॉ. प्रवीण झगडे, नारायण मिरगळ, रमेश पाटणे, अशोक जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com