

rat19p4.jpg-
38260
चिपळूण ः अक्षयतृतीयानिमित्त बाजारपेठेत दाखल झालेला रत्नागिरी हापूस.
---------
चिपळुणात हापूसलाच मागणी
दरही वधारलेले ; शंभर-सव्वाशे पेटी हापूस मुंबई, पुण्यात
चिपळूण, ता. १९ ः अक्षय्य तृतीयेनिमित्त हापूस आंब्याला मागणी वाढली आहे. रत्नागिरी हापूस आंब्याबरोबर बाजारात कर्नाटकचा आंबा दाखल झाला आहे. मात्र रत्नागिरी हापूसला दर चांगला मिळत आहे. रत्नागिरी हापूसचे उत्पादन कमी झालेले असले तरीही, मागणी कायम आहे. त्यामुळे कर्नाटकचा आंबा येवूनही रत्नागिरी हापूस आंब्याचे दर स्थिर आहेत. चिपळूण शहरातून सुमारे शंभर-सव्वाशे पेटी हापूस आंबा दररोज मुंबई, पुण्यासह इतर मोठ्या शहरात विक्रीसाठी पाठवला जात आहे.
चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये हापूस आंब्याच्या बागा आहेत. हे बागायतदार स्वतः आंबे काढून गाडीने मोठ्या शहरातील व्यापाऱ्यांना विकत आहेत. काही बागायतदार कराराने बागा व्यवसायिकांना देतात. हापूस आंबा विक्रीसाठी चिपळूण शहर हीच मोठी बाजारपेठ आहे. यामध्ये स्थानिक बाजारात लहान फळांची विक्री केली जाते. तर दर्जेदार मोठी फळे बॉक्समध्ये भरून परजिल्ह्यात विक्रीसाठी पाठवतात. एप्रिल आणि मे हे दोन महिने आंबा हंगामाचे आहेत. रत्नागिरी हापूसचे सर्वानांच विशेष आकर्षण आहे. खवय्ये पाहिजे तेवढी किंमत देऊन हापूस खरेदी करतात. हे लक्षात घेऊन काही विक्रेते कर्नाटकी आंबा विक्रीसाठी चिपळूणला आणत आहेत. रविवारी (ता. १९) अक्षयतृतीयेसाठी बाजारात आंब्याला मोठी मागणी होती. त्यामुळे मुहूर्तासाठी हापूस आंब्यांची आवकही वाढली आहे. सध्या फळाच्या आकारानुसार बाजारात हापूसचा दर ८०० ते १००० रुपये डझन आहे. तर कर्नाटक आंबा ५५० ते ६५० रुपये डझन दराने विकला जातो. रत्नागिरी हापूस पेक्षा कर्नाटक आंब्याचे दर कमी आहेत. तरीही नागरिकांचा कल रत्नागिरी हापूस खरेदीकडे अधिक आहे.
--------
चौकट
असा ओळखा हापूस आंबा
रत्नागिरी हापूस आंबा गोलाकार असतो, तसेच त्याची साल पातळ असते. फळाच्या देठाकडे पिवळसर तर टोकाकडे लालसर किंवा केशरी असतो. रत्नागिरी हापूसचा वास लवकर पसरतो. रत्नागिरी हापूस कापल्यानंतर पिवळसर दिसतो.
--------------
कोट
यंदा हापूस आंबा कमी आहे. कर्नाटकचा आंबा बाजारात आला आहे. मात्र रत्नागिरी हापूसबद्दल सरकारकडून आणि व्यापाऱ्यांकडून चांगली जनजागृती झाली आहे. त्यामुळे आंब्याची मागणी कायम आहे
- अक्षय केदारी, आंबा विक्रेते, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.