

-rat१९p५.jpg-
26O38298
रत्नागिरी : जन शिक्षण संस्थान आयोजित विविध अभ्यासक्रमांतील गुणवंत विद्यार्थिनींसह मागे उभे डॉ. विनय नातू, सौरभ मलुष्टे, वर्षा ढेकणे, शिल्पा सुर्वे, दीपक मेंगाणे, अदिती सावंत, नरेंद्र गावंड, जानकी घाटविलकर आदी.
----
व्यवसायातून रोजगार निर्मिती करा
डॉ. विनय नातू ः ‘जन शिक्षण’तर्फे बक्षीस वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : ‘लाभार्थ्यांनी नोकरीच्या मागे न धावता, आपल्या कौशल्याच्या आधारे स्वतःचा व्यवसाय उभा करून इतरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात,’ असे आवाहन माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी येथे केले.
जन शिक्षण संस्थानतर्फे वर्ष २०२५-२६ चा प्रमाणपत्र वितरण सोहळा मराठा भवन येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, अध्यक्ष डॉ. विनय नातू, उपाध्यक्ष अदिती सावंत उपस्थित होते. उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, डीआरडीएचे प्रविण पावसकर, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, महिला व बालकल्याण सभापती प्रीती सुर्वे, नगरसेविका वर्षा ढेकणे, सौरभ मलुष्टे उपस्थित होते.
संचालिका निधी सावंत यांनी माजी मंत्री सुरेश प्रभू व उमा प्रभू यांच्या मानव साधन विकास संस्थेअंतर्गत तसेच जन शिक्षण संस्थानतर्फे जिल्ह्यात कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे रोजगार निर्मितीसाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे कार्य सुरू असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.