चिपळूण येथील भागुराम सावंत यांच्या लेखसंग्रहाला पूरस्कार

चिपळूण येथील भागुराम सावंत यांच्या लेखसंग्रहाला पूरस्कार
Published on

‘गतस्मृतीची गजबज’ला पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः गोमंतक साहित्य सेवक मंडळ पणजीतर्फे आयोजित केलेल्या कादंबरीकार गजानन देसाई पुरस्कृत स्व. ब्रह्मराज देसाई स्मृती साहित्य पुरस्कार योजनेतील साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये चिपळूण येथील साहित्यिक राष्ट्रपाल सावंत यांच्या गतस्मृतीची गजबज या वैचारिक लेखसंग्रह पुस्तकाला मिळाला.
कथा विभागाचा ब्रह्मराज देसाई स्मृती पुरस्कार पणजी येथील अपूर्वा ग्रामोपाध्ये यांच्या आभास या कथासंग्रहास मिळाला. मडगाव येथील बबिता नार्वेकर यांच्या शब्दप्रज्ञा कवितासंग्रहाला तर फातोर्डा मडगाव येथील रेशम झारापकर यांच्या रेशमगाठ या ललित लेखसंग्रहास मिळाला. महाराष्ट्रातील साहित्यिकांसाठी असलेल्या पुरस्कारातील बालवाङ्मयाचा पुरस्कार नागपूर येथील गणेश भाकरे यांच्या थेंबाथेंबाची कहाणी या बालसंग्रहाला मिळाला. चिपळूण महाराष्ट्र येथील साहित्यिक राष्ट्रपाल सावंत यांच्या गतस्मृतीची गजबज या वैचारिक लेखसंग्रह पुस्तकाला मिळाला. या पुस्तक पुरस्कार योजनेतील पुस्तकाचे परीक्षक म्हणून अनिल वैद्य, प्रा. न. अ. पाटील बेळगाव यांनी काम पाहिले. पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना रोख रक्कम प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com