

swt2011.jpg
38534
साळिस्ते ः विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
आदर्श व्यक्तिमत्वांचा
साळिस्तेत गौरव
''दीपगौरव'' पुरस्कार सोहळा ः विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा:
तळेरे, ता. २० : येथील सामाजिक कार्यकर्ते, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते (कै.) दीपक गुरव यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त साळिस्ते येथे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. दीपक गुरव मित्रमंडळ आणि भारतीय मजदूर संघ (कणकवली, वैभववाडी, देवगड उपविभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने यावेळी विविध क्षेत्रांत आदर्श कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ''दीपगौरव पुरस्कार'' देऊन सन्मानित करण्यात आले.
साळिस्ते क्र. १ शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. स्पर्धेचा निकाल असा : मोठा गट चित्रकला-सेजल ताम्हणकर, कीर्ती आंबेरकर, राज कांजीर, हस्ताक्षर स्पर्धा-प्रथम मिताली कणकेकर व स्वरा चिके, द्वितीय देवयानी गुरव, तृतीय दुर्वा गुरव, दुर्वा चिके (तृतीय), वक्तृत्व स्पर्धा-स्वरा चिके, हर्षाली घाडी, दुर्वा चिके. लहान गट हस्ताक्षर स्पर्धा-अनुश्री तळेकर, रुही गुरव, प्रणय गुरव. वक्तृत्व स्पर्धा-चिराग गुरव, वेदांत जंगले, चैतन्य पांचाळ, चित्रकला स्पर्धा-काव्य आठे, हर्षद मेस्त्री, रितिका ताम्हणकर.
याप्रसंगी उपसरपंच जितेंद्र गुरव, अशोक जगताप, सचिन लवेकर, माजी सरपंच राधाबाई गुरव, चंद्रकांत हारयान, उदय बारस्कर, समीर ताम्हणकर, रवींद्र गुरव, विजय मेस्त्री, गजानन रामाणे, प्रशांत बारस्कर, सचिन ताम्हणकर, अनंत गुरव, रामचंद्र गुरव, अशोक गुरव, प्रकाश गुरव, गणेश चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा कोषाध्यक्ष ओंकार गुरव व संतोष पाष्टे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.