

rat२०p१३.jpg-
३८५२५
राजापूर ः बागांना लागलेला वणवा.
rat२०p१४.jpg-
३८५२६
अग्निशमन बंब
--------------
इंट्रो
दिवाळीनंतर सर्रास गावातील सड्यांवर लागणाऱ्या वणव्यात शेतकऱ्यांच्या हजारो एकर बागा भस्मसात होतात. शहरी भागात आग लागल्यास नगरपालिका किंवा जवळच्या खासगी कंपनीकडील अग्निशमन बंब तत्काळ उपलब्ध होतो; मात्र, गावपातळीवर ग्रामपंचायतीचा स्वतःचा अग्नीशमन बंब नसल्यामुळे त्यांना नगरपालिकेच्या अग्निशमन बंबावर अवलबूंन राहावे लागते. सध्या अग्निशमन यंत्रणेची स्थिती ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ अशीच आहे. जिल्ह्यात ९ नगरपालिकांपैकी ५ ठिकाणी अग्निशमन यंत्रणा उपलब्ध आहे; परंतु ४ ठिकाणी अद्यापही अशी यंत्रणाच नाही. त्यामुळे अनेकवेळा घटनास्थळी वेळेत अग्निशमन बंब पोहचत नाही आणि लाखो रुपयांच्या मालमत्तेची राखरांगोळी होते. हे टाळण्यासाठी ग्रामीण भागांसाठी आपत्कालीन अग्नीशमन यंत्रणा उभारण्याची गरज आहे...!
- राजेंद्र बाईत, राजापूर
---------
वणवे नियंत्रणासाठी अग्निशमन यंत्रणेचा अभाव
चार नगर पालिकांकडे यंत्रणाच नाही; प्रशासन सज्ज होणार केव्हा ?
पूर्वी गावामंध्ये शेतकऱ्यांच्या आंबा-काजूच्या बागा नव्हत्या; मात्र, अलिकडे दोन दशकांमध्ये शासकीय योजनांचा लाभ घेत शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षे पडीक असलेल्या जागांमध्ये आंबा-काजूच्या बागा विकसित केल्या आहेत. वर्षागणिक आंबा-काजूच्या ओलिताखालील क्षेत्रात वाढ होत आहे; मात्र सड्यांवर अचानक लागणाऱ्या वणव्यांमध्ये या सर्वांची राख होते. बागेभोवती जाळरेषा काढणे, साफसफाई करणे यांसारख्या उपाययोजना करूनही वणवे रोखणे अशक्य झाले आहे. अशा स्थितीत त्या त्या गावात वा पंचक्रोशीत अग्निशमन यंत्रणा उभारलेली असेल तर त्या ठिकाणी तत्काळ उपलब्ध होणाऱ्या अग्निशमन बंबाच्या साह्याने वणव्यावर नियंत्रण मिळवणे आणि त्यातून होणाऱ्या संभाव्य लाखो रुपयांचे नुकसान कमी करणे शक्य आहे.
--------
भौगोलिक स्थितीमुळे बंब पोहचण्यास मर्यादा
जिल्ह्यात डोंगरदऱ्यांमध्ये गावे विखुरलेली आहेत. अनेक गावांमध्ये वीस-पंचवीस किलोमीटरचे अंतर असते. भौगोलिक स्थिती आणि गावांमधील अंतराचा विचार करता मोठे अंतर असलेल्या गावांमध्ये आगीची घटना घडल्यास आजुबाजूच्या नगर पालिकेकडील बंब वेळेत पोहचत नाही. अग्निशमन बंब वेळेत न पोहचल्याने मालमत्तेची राखरांगोळी झालेली असते. त्यासाठी वणव्यांवर नियंत्रण आणण्यासाठीची यंत्रणा ठिकठिकाणी उभारण्याची आवश्यकता आहे. लोकवस्तीच्या परीसरात आग लागण्याच्या घटना तुरळक घडतात. ग्रामीण भागातील वणव्यांच्या घटनांचा विचार करता अलिकडील काळात वणवा लागण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. त्याची प्रशासनाकडे फारशी नोंद नाही तरी त्याचे प्रमाण लक्षणीय आहे.
---------
खासगी यंत्रणांवर अवलंबित्व
रत्नागिरीत तालुक्यात एमआयडीसीसह फिनोलेक्स कंपनीची स्वतःची अग्निशमन यंत्रणा उपलब्ध आहे. तसेच लोटे एमआयडीसीमध्येही तशीच स्थिती आहे. त्यामुळे या परिसरातील गावात आग लागली तर ही खासगी यंत्रणा उपयुक्त ठरते. वणवा असेल तर सर्वच यंत्रणा तिथे हजेरी लावते; परंतु आपल्याकडे जंगलभागांना वणवे लागले तर वेगळी यंत्रणा सज्ज नाही.
--------
चौकट
रत्नागिरी जिल्ह्यातील अग्निशमन यंत्रणा
अग्निशमन बंब बुलेट
राजापूर नगर पालिका १ १
रत्नागिरी नगर पालिका ३ २
चिपळूण नगर पालिका ३ २
खेड नगर पालिका २ १
दापोली - १
देवरूख - १
लांजा - १
मंडणगड नाही नाही
--------
कोट
शॉर्टसर्किट असो वा अन्य कारणास्तव ग्रामीण भागात घरांना आग लागून त्यात लाखो रुपयांचे नुकसान होते. अलीकडील काही वर्षांमध्ये गावच्या सड्यांवर विकसित केलेल्या बागा वणव्यात भस्मसात होण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा आपत्कालीन स्थितीत गावात अग्निशमन बंब उपलब्ध असल्यास तो वेळेवर पोहचेल आणि आगीत होणारे नुकसान कमी होईल. त्यासाठी गावामध्येच अशी यंत्रणा उभी केली पाहिजे.
- राजेश शिंदे, आंबा बागायतदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.