तळेरे पीएमश्री शाळेत व्यसनमुक्तीची ‘गुढी’

तळेरे पीएमश्री शाळेत व्यसनमुक्तीची ‘गुढी’
Published on

38563

तळेरे पीएमश्री शाळेत व्यसनमुक्तीची ‘गुढी’

मार्गदर्शन सत्र उत्साहात; संवादात्मक उपक्रमांतून विद्यार्थ्यांचे प्रबोधन

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २० : पीएमश्री आदर्श पूर्ण प्राथमिक शाळा तळेरे क्र. १ येथे ‘पीएमश्री’ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी तंबाखू व्यसनमुक्ती मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता आणि शैक्षणिक सक्षमता निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात डॉ. अनिल नेरुरकर प्रेरित सिंधू फाउंडेशनच्या श्रावणी मदभावे आणि सतीश मदभावे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तंबाखूजन्य पदार्थांचे आरोग्यावर, कुटुंबावर आणि समाजावर होणारे घातक दुष्परिणाम सविस्तरपणे समजावून सांगितले. ‘व्यसनमुक्त जीवन हीच खरी प्रगतीची दिशा आहे’, असा संदेश त्यांनी यावेळी दिला. प्रश्नावली आणि संवादात्मक उपक्रमांमुळे या सत्रात विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता.
या उपक्रमाचे तळेरे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र पावसकर यांनी मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा देवकी तळेकर, मुख्याध्यापक पावसकर, सर्व शिक्षक आणि पालकांचे सहकार्य लाभले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश
श्रावणी मदभावे यांच्या संकल्पनेतून ‘व्यसनमुक्तीची गुढी उभारून शिक्षणाचा पाया रचू’ ही अभिनव कल्पना साकारण्यात आली. पारंपरिक गुढीला स्वच्छ आणि निरोगी जीवनाचे प्रतीक मानून, त्याचा संदर्भ व्यसनमुक्तीच्या संकल्पनेशी जोडण्यात आला.
दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत तळेरे बाजारपेठेमध्ये जनजागृती रॅली काढली. हातात प्रबोधनात्मक फलक (पोस्टर्स) घेऊन आणि घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश दिला. गुढीपाडव्याची संस्कृती आणि सामाजिक प्रबोधन यांचा सुंदर संगम या रॅलीच्या माध्यमातून पाहायला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com