मळगावात टायर फुटून खडीवाहू डंपर उलटला

मळगावात टायर फुटून 
खडीवाहू डंपर उलटला
Published on

38557

मळगावात टायर फुटून
खडीवाहू डंपर उलटला

चालक सुखरूप, वाहतूक खोळंबली

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः कसाल ते गोव्याच्या दिशेने खडी वाहतूक करणाऱ्या डंपरचा टायर फुटल्याने तो दुभाजक तोडून पलीकडच्या बाजूला पलटी झाला. या अपघातात चालक थोडक्यात बचावला. मात्र, डंपरमधील खडी रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला.
झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव जोशी-मांजरेकरवाडी येथे आज दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला केबिनमधून सुरक्षितरित्या बाहेर काढले. यानंतर महामार्गावरून जाणाऱ्या जेसीबीला थांबवून रस्त्यावरील खडी बाजूला काढण्यात आली. त्यामुळे बराच वेळ खोळंबलेली वाहतूक सुरळीत झाली. पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सायंकाळी उशिरा अपघातग्रस्त डंपर बाजूला करण्यात आला. मदतकार्यात भाजपचे स्थानिक बुथ अध्यक्ष दीपक जोशी, सामाजिक कार्यकर्ते संजय जोशी, अजय राऊळ, बाळा जोशी, सतीश जोशी, बाळा आरोंदेकर, शिवम जोशी यांसह स्थानिकांनी सहभाग घेतला.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com