

आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त व्याख्यान
रत्नागिरी : श्री गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा तसेच रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. २५) सायंकाळी ५ वा. राणी लक्ष्मीबाई सभागृहात कार्यक्रम होईल. वैशाख शुक्ल पंचमीला आद्य शंकराचार्य यांची जयंती असते त्या निमित्ताने ‘आद्य शंकराचार्यांचा भक्तिमार्ग’ या विषयावर संपदा निमकर व्याख्यान देणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेचे अध्यक्ष वैद्य मंदार भिडे यांनी केले आहे.