

कृषी विभागातर्फे
४ लाख काजू कलमे
शेतकऱ्यांना होणार मोफत वाटप
चिपळूण, ता. १७ : राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी ‘मागेल त्याला काजू कलमे’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी कृषी विभागाच्या विविध रोपवाटिकांमध्ये (नर्सरी) सुमारे ४ लाख काजू कलमे तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या योजनेंतर्गत एका शेतकऱ्याला १० ते ५० कलमे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
कृषी विभागाच्या योजनेविषयी माहिती देताना उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील ६ ते ७ शासकीय रोपवाटिकांमध्ये एकूण ३ लाख ९० हजार कलमे तयार केली जात आहेत. यावर्षी २ लाख कलमे वितरणासाठी सज्ज आहेत, तर पुढील वर्षी उर्वरित २ लाख कलमे तयार होतील. इच्छुकांनी ''महा-डीबीटी'' पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील काजू लागवडीखालील क्षेत्र वाढण्यास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे. या योजनेचा लाभ मिळावण्यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा उतारा सादर करावयाचा आहे. पूर्वीच्या अटी रद्द करण्यात आल्या असून ज्या शेतकऱ्यांनी १० वर्षांपूर्वी ''रोहयो''तून लाभ घेतला होता, मात्र आता त्यांची झाडे अस्तित्वात नाहीत, त्यांनाही या योजनेचा पुन्हा लाभ घेता येणार आहे. तसेच मुख्य फळबागेसोबतच शेताच्या बांधावर देखील ही काजू कलमे लावता येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.