मंडणगड ः माहू तुळशी मार्गावर अपूर्ण कामांमुळे धोका

मंडणगड ः माहू तुळशी मार्गावर अपूर्ण कामांमुळे धोका
Published on

rat20p8.jpg
38503
मंडणगड : माहू-तुळशीदरम्यान वळणावर मोरीचे काम अजूनही सुरू करण्यात आलेले नाही.
----------------
‘माहू-तुळशी’वर अपूर्ण कामांचा धोका
मोरीचे काम रखडले; पावसाळ्यापूर्वी उपाययोजनांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २० ः राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ अंतर्गत सुरू असलेल्या कामांपैकी माहू ते तुळशीदरम्यानचे महत्त्वाचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे पावसाळ्यात तिथे गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः एका वळणावरील मोरीचे काम प्रलंबित असून, मुसळधार पावसात मंडणगड किल्ल्यावरून येणाऱ्या पाण्यामुळे हा मार्ग बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पावसाळ्यात या ठिकाणी नाल्याला पाणी आल्याने यापूर्वीही अनेकवेळा वाहतूक ठप्प झालेली होती. यंदाही संबंधित काम सुरू न झाल्याने तीच परिस्थिती उद्भवण्याची भीती वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी तातडीने मोरीचे काम पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, तुळशी व धुत्रोली येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पुलांवर रस्ता आणि पुलाची पातळी समान नसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. वेगाने येणारी वाहने पुलावर आपटण्याच्या घटना घडत असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी आहे. या ठिकाणी तातडीने दुरूस्ती करून रस्त्यांची समतोल पातळी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन मोरीचे काम पूर्ण करावे, पुलांवरील रस्त्यांची समान पातळी करावी तसेच बसथांब्यांची उभारणी तत्काळ करावी, अशी एकमुखी मागणी नागरिक व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

चौकट
बसथांब्याअभावी प्रवाशांची गैरसोय
पाचरळ, पाले, तुळशी, धुत्रोली, शिरगाव, चिंचाळी ते म्हाप्रळ या दरम्यान नियमानुसार उभारण्यात येणारे बसथांबे अद्याप बांधण्यात आलेले नाहीत. परिणामी, भरउन्हाळ्यात नागरिकांना उघड्यावर उभे राहून प्रवासाची वाट पाहावी लागत असून, तीव्र उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. या सुविधेअभावी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांची विशेष गैरसोय होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com