

-ratchl२०१.jpg-
P26O38570
चिपळूण ः विद्यार्थ्यांचे कौतुक करताना आमदार शेखर निकम.
-----------------
सह्याद्रीच्या शाळेचे स्पर्धा परीक्षेत यश
चिपळूण, ता. २० ः खेर्डी-चिंचघरी (सती) येथील सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या प्राथमिक शाळेने स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार शेखर निकम, अनिरूद्ध निकम, सचिव महेश महाडीक, मुख्याध्यापक अरविंद सकपाळ आदींच्या हस्ते झाला. सह्याद्री कॉम्पिटिटिव्ह ॲकॅडमीद्वारे आयोजित सह्याद्री स्पर्धा परीक्षामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवले. या परीक्षेत चौथीतील दुर्वांक शिंदे याने संस्थास्तरावर तृतीय व शाळास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. तिसरीतील अमन कांबळे याने संस्थास्तरावर तृतीय व शाळास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला तर आयुष मोरे याने संस्थास्तरावर पाचवा व शाळास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.