

38581
बांद्यातील तरुणांचा
व्यवसायात आदर्श
प्रमोद कामत ः ‘कृष्णाई फ्रूट्स’चे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २० ः स्थानिक तरुणांनी व्यवसाय क्षेत्रात धाडसाने पाऊल टाकून स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केला आहे. कृष्णाई फ्रूट्ससारख्या उपक्रमातून कोकणातील कोकणी मेव्याची दर्जेदार उत्पादने ही थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतील आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी येथे व्यक्त केला.
बांदा कट्टा कॉर्नर येथे कृष्णाई फ्रूट्स (कोकणी मेवा) या दालनाचे उद्घाटन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर उत्साहपूर्ण वातावरणात झाले. यावेळी श्री. कामत बोलत होते. या कार्यक्रमास बांदा शहर व परिसरातील मान्यवर, व्यापारी, ग्रामस्थ व नागरिकांची मोठी उपस्थिती होती. कृष्णाई फ्रूट्स या दुकानातून ताजी फळे, कोकणी मेवा, विविध पेये उपलब्ध होणार असून, ''बेक अँड आर्ट''मधून आकर्षक केक व बेकरी पदार्थ ग्राहकांना मिळणार आहेत.
बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी, स्थानिक तरुणांनी उद्योगधंद्यात पुढाकार घेणे ही आनंदाची बाब आहे. अशा उपक्रमांना ग्रामपंचायतीचे नेहमीच सहकार्य राहील, असे सांगितले. महिलांनी व कुटुंबांनी एकत्र येऊन उभारलेले असे व्यवसाय प्रेरणादायी आहेत. ग्राहकांचा विश्वास संपादन करून हा व्यवसाय निश्चितच प्रगती करेल, असा विश्वास भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी व्यक्त केला. यावेळी लेखापरीक्षक सुधीर नाईक, साईप्रसाद कल्याणकर, महादेव देसाई, मंदार कल्याणकर, बाबा काणेकर, संतोष सावंत, सिद्धेश पावस्कर, सुनील राऊळ, मनोज कल्याणकर, नारायण गावडे, वाफोली उपसरपंच विनेश गवस, विलवडे सरपंच लक्ष्मण दळवी, उदय येडवे, उमेश येडवे आदी मान्यवर उपस्थित होते. शिवराम गावडे व काशिबाई गावडे यांच्या हस्ते फित कापून दालनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक शिवम गावडे, ईश्वरी गावडे, सीताराम गावडे, सुप्रभा गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.