आनंद शिशुवाटिकेमध्ये रंगला शुभेच्छा सोहळा

आनंद शिशुवाटिकेमध्ये
रंगला शुभेच्छा सोहळा
Published on

38590

आनंद शिशुवाटिकेमध्ये
रंगला शुभेच्छा सोहळा
सावंतवाडी ः एज्युकेशन सोसायटीची बालवाडी ‘आनंद शिशुवाटिके’चा बालवाडीतून पहिलीमध्ये जाणाऱ्या मुलांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात झाला. यावेळी शिशुवाटिकेच्या निपुण गटाच्या मुलांना बालवाडीतून पहिलीमध्ये जाताना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच पालकांकडून शिशुवाटिकेला दोन वायरलेस कॉलर माईक भेट स्वरुपात देण्यात आले. सर्व शिक्षिका आणि शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार पालकांकडून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई यांनी, मुले आणि पालकांमध्ये मित्रत्वाचे नाते असणे योग्य ठरते, असे मत व्यक्त केले. संस्था संचालक आणि पालक अण्णा म्हापसेकर यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षकांचे ऋण व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, संचालिका राजश्री टिपणीस, प्राजक्ता वेंगुर्लेकर, सुचिता वारंग, विभा पई, अनुष्का धाऊसकर, सौ. पांगम, दिव्यानी शिंदे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com