

kan211.jpg
38674
कणकवली ः येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी आढावा बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे उपस्थित होते.
पावसाळी आपत्तींसाठी सर्व विभागांनी सज्ज राहावे
जगदीश कातकर ः कणकवली तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.२१ ः पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळणे, पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर, वीज पुरवठा खंडित झाल्यास तातडीने करावयाची उपाययोजना आदींसाठी सर्व विभागांनी सज्ज राहावे, असे आवाहन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले.
येथील तहसील कार्यालयात सर्व खाते प्रमुखांच्या उपस्थितीत कणकवली तालुका आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक झाली. यात प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला निवासी नायब तहसीलदार, पंचायत समिती, नगरपंचायत अधिकारी, महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली पोलीस, वीज वितरणचे अधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. कातकर म्हणाले, तालुक्यात कुठेही पावसाळ्याच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीची घटना उद्भवल्यास ०२३६७ २३२०२५ या क्रमांकावर संपर्क साधावा. पावसाळ्याच्या कालावधीत वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळल्यास ती तत्काळ हटविण्याकरिता जेसीबी आणि वुड कटर देखील कार्यरत ठेवण्यात आले आहेत.
प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर नदी नाल्यांमध्ये पोहणाऱ्या व्यक्तींची यादी तयार ठेवावी. तसेच गावातील रस्ते किंवा घरांवर झाडे कोसळल्यास ती दूर करण्यासाठी लाकूड कटर आणि जेसीबी याचीही व्यवस्था करून ठेवावी अशा सूचना गटविकास अधिकाऱ्यांना श्री.कातकर यांनी दिल्या.
दरम्यान रस्त्यांवर पडलेली झाडे तत्काळ बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याकरता सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक त्या यंत्रसामग्रीची सज्जता ठेवावी. तर महा वितरण विभागाने वीज वाहिन्यांवर आलेल्या फांद्या आणि झाडे तोडावीत. तसेच गंजलेले धोकादायक पोल प्राधान्याने बदलावेत. महामार्गावर पाणी साठणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून तेथे तत्काळ उपाययोजना करा असेही निर्देश प्रांताधिकाऱ्यांनी दिले.
नदीपात्रांमध्ये धरणातील पाणी सोडताना भागातील ग्रामपंचायती आणि कणकवली तालुका प्रशासनाला कळवणे अत्यावश्यक आहे. तर वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तत्काळ वीज पुरवठा सुरू करण्यासाठी वीज वितरण कडील ठेकेदारांची संख्या वाढवा असे निर्देश तहसीलदार श्री.देशपांडे यांनी दिले तसेच प्रशासनाच्या सर्व विभागांनी पावसाळ्याच्या कालावधीत अलर्ट राहायचे असून जनतेला कोणताही त्रास होत नाही याची काळजी घ्या, अशा सूचनाही प्रांताधिकारी कातकर व तहसीलदार देशपांडे यांनी दिल्या.
चौकट
आपत्तीच्या अनुषंगाने सज्जता ठेवा
वादळीवारे आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी जे साहित्य आवश्यक ठरते. त्या साहित्याची आधीच खरेदी करून ठेवण्याचे निर्देश प्रांताधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले. तर फोंडाघाटात दरड कोसळण्याच्या घटना घडल्यास तातडीने उपाययोजना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा असे निर्देश श्री.कातकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.