तेंडोली श्री अनलादेवीचा आजपासून वर्धापन दिन

तेंडोली श्री अनलादेवीचा आजपासून वर्धापन दिन
Published on

swt2110.jpg
38692
श्री देवी अनलादेवी

तेंडोली श्री अनलादेवीचा
आजपासून वर्धापन दिन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ ः तेंडोली-भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवीचा वर्धापन दिन सोहळा २२ ते २४ एप्रिल या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
उद्या (ता. २२) सकाळी ८ वाजता श्री जगदंबा अनलादेवी चरणी लघुरुद्राभिषेक, महापूजा, दुपारी १ वाजता नैवेद्य, प्रसाद, सायंकाळी ४ वाजता नितीन आसयेकर प्रस्तुत श्री भूमिका दशावतार मंडळ (मळगाव) यांचा नाट्यप्रयोग, ७ वाजता खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा, गुरुवारी (ता. २३) सकाळी ८ वाजता श्री देवी चरणी अभिषेक, ९ वाजता द्वादश पाठात्मक नवचंडी (पल्लवीत) कुमारीपूजन, कुष्मांड बळी, सांगता आशीर्वाद, दुपारी १ वाजता नैवेद्य, प्रसाद, सायंकाळी ५ वाजता रामकृष्ण हरी महिला भजन सेवा संघ (तेंडोली, बुवा-जुई राऊळ) यांचे भजन, ७ वाजता मोरेश्वर मंडळ (नेरुर) यांचे भजन, रात्री ८ वाजता श्री जैतीर कृपा मंडळ (तुळस-वेंगुर्ले) यांचे भजन, ९ वाजता विश्वकला मंच (सावंतवाडी) यांचा ''व्हरायटी शो'', शुक्रवारी (ता. २४) सकाळी ८ वाजता श्री अनलादेवी चरणी सार्वजनिक लघुरुद्र, अभिषेक, महापूजा, १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, आरती, नैवेद्य, गाऱ्हाणे, प्रसाद, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता स्नेहलदीप सामंत (वालावल-हुमरमळा) यांचे कीर्तन, ७.३० वाजता ग्रामस्थांची सुस्वर भजने, रात्री ९ वाजता पालखी प्रदक्षिणा, १० वाजता श्री नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळ (मोचेमाड) यांचे नाटक होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री अनलादेवी सेवा मंडळ, तेंडोली-भोमवाडी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com