

swt213.jpg
38697
रोणापाल : येथील दयासागर छात्रालयात आयोजित कार्यक्रमात मुलांसोबत उपस्थित असलेले मान्यवर.
दयासागर छात्रालयातील मुलांना
अन्नपूर्णा फाऊंडेशनतर्फे मदत
बांदा, ता. २१ : वाढदिवस हा केवळ केक कापून किंवा शुभेच्छा स्वीकारून साजरा करण्याचा दिवस नसून, समाजातील वंचित, गरीब व निराधार मुलांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याची संधी आहे. या मुलांच्या डोळ्यातील समाधान, त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य आणि त्यांना मिळालेला आधार हाच माझ्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे. समाजातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने अशा गरजूंसाठी हात पुढे केला, तर अनेकांचे आयुष्य उजळून निघेल, असे प्रतिपादन सावंतवाडीच्या माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी रोणापाल येथे केले.
अन्नपूर्णा सेवा फाऊंडेशन सावंतवाडी यांच्या वतीने रोणापाल येथील दयासागर छात्रालयातील मुलांना जीवनावश्यक वस्तू तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्रीमती कोरगावकर बोलत होत्या. यावेळी युवा उद्योजक अखिलेश कोरगावकर, ऐश्वर्या कोरगावकर, संदेश पाटील, नीलेश मोरजकर, प्रवीण परब, मृणाली वाडकर, जयदेव डोलारकार, शीतल डिसोजा, रिया मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते. छात्रालयाचे व्यवस्थापक जिवबा वीर यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले. अखिलेश कोरगावकर यांनी यापुढेही फाऊंडेशनच्या माध्यमातून छात्रालयाला भौतिक व शैक्षणिक सुविधासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.