बसस्थानकात सिमेंटच्या मोऱ्यांचा अडथळा

बसस्थानकात सिमेंटच्या मोऱ्यांचा अडथळा
Published on

rat२१p१३.jpg-
26O38702
भरणे ः खेड रस्ताकामासाठी खेड बसस्थानकात ठेवण्यात आलेल्या मोऱ्या.

खेड बसस्थानकात मोऱ्यांचा अडथळा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २१ ः भरणे-खेड रस्त्याच्या रुंदीकरण आणि मजबुतीकरणाचे काम सध्या सुरू आहे; मात्र, या कामासाठी आणलेल्या सिमेंटच्या मोठ्या मोऱ्या (पाईप्स) थेट खेड बसस्थानक परिसरातच आणून ठेवल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एसटी बसस्थानकात या मोऱ्या रचून ठेवल्यामुळे पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असून, वाहनांची मोठी कोंडी होत आहे. परिणामी, प्रवाशांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः गर्दीच्यावेळी ही समस्या अधिकच तीव्र होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळील गटाराचे सांडपाणी आत येत असल्याचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची नगरपालिकेने तातडीने दखल घेतली. बांधकाम विभागाच्या माध्यमातून संबंधित ठेकेदाराकडून रात्रीच या समस्येची दुरुस्ती करून तो प्रश्न सोडवण्यात आला. असे असले तरी, एकीकडे रस्त्याच्या कामाची गती अत्यंत संथ आहे आणि दुसरीकडे कामाचे साहित्य थेट बसस्थानकातच पडून असल्याने प्रवाशांची अडचण मात्र अद्याप कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com