अध्ययन केंद्र वारसा संवर्धनाचे व्यासपीठ

अध्ययन केंद्र वारसा संवर्धनाचे व्यासपीठ
Published on

38742

अध्ययन केंद्र वारसा संवर्धनाचे व्यासपीठ

आशीष शेलार ः कणकवलीत सिंधुदुर्ग महाविद्यालयातर्फे सत्कार

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २१ : या अध्ययन केंद्रामुळे सागरी किल्ल्यांच्या इतिहासाचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि वारसा संवर्धनाला नवी दिशा मिळेल. भविष्यात हे केंद्र संशोधनासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरेल. युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या ऐतिहासिक जलदुर्गांचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घ्यावी आणि सक्षम, सशक्त राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी सत्कारप्रसंगी केले. सागरी किल्ले अध्ययन केंद्राच्या स्थापनेसाठी आवश्यक वित्तीय मान्यता व तांत्रिक बाबींमध्ये शासनाच्या स्तरावर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
श्री. शेलार यांचा येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण व कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या वतीने शासकीय विश्रामगृह, कणकवली येथे सन्मान करण्यात आला. मालवण येथे ‘सागरी किल्ले अध्ययन केंद्र’ स्थापन करण्यासाठी त्यांनी केलेल्या पुढाकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सन्मान करण्यात आला. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य गुरुनाथ राणे यांच्या हस्ते शेलार यांना शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
मुंबई विद्यापीठाअंतर्गत मालवण येथे सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार अभेद्य सागरी किल्ल्यांच्या सखोल
या सत्कारप्रसंगी संस्थेचे सचिव चंद्रशेखर कुशे यांनी श्री. शेलार यांचे आभार व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर, सदस्य विजय केनवडेकर, गुरुनाथ राणे, प्रभारी प्राचार्य कैलास राबते, इतिहास अभ्यासक व संशोधक डॉ. ज्योती बुवा तोरसकर, डॉ. सुमेधा नाईक, प्रा. डॉ. हंबीरराव चौगले, प्रा. संग्रामसिंह पवार, प्रा. हसन खान उपस्थित होते.
---
प्रस्तावास प्रशासकीय मान्यता
अभ्यासासाठी विशेष ‘अध्ययन केंद्र’ स्थापन करण्याची घोषणा श्री. शेलार यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ३५८ वर्षपूर्ती सोहळ्यात केली होती. यासाठी पन्नास लाखांचा निधीही घोषित केला होता. त्यांच्या घोषणेनुसार मुंबई विद्यापीठ संलग्न स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने सादर केलेल्या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून पुरातत्व व वास्तुसंग्रहालय संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com