

बातमी क्र. 33 (पान ५ साठी, संक्षिप्त)
(टीप- वितरण विभागाने दिलेली बातमी)
38751
व्यसनमुक्तीसाठी रत्नागिरीत जनजागृती
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वेदांती जिल्हा व्यसनमुक्ती केंद्रातर्फे जिल्हा शासकीय रुग्णालयात विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाद्वारे उपस्थित नागरिकांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून देत संस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली. नशेच्या आहारी गेलेल्या रुग्णांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा व्यसनमुक्ती केंद्रामार्फत मोफत औषधोपचार आणि तज्ज्ञ समुपदेशकांद्वारे उपचार केले जातात. या मोहिमेंतर्गत माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले तसेच बॅनरच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. या उपक्रमाला जिल्हा व्यसनमुक्ती केंद्राचे प्रो-डायरेक्टर स्वप्नील कांबळे, प्रकल्प समन्वयक त्रिपली कोळंबेकर, डॉ. उत्तमराव कांबळे, डॉ. स्नेहल तोडकर उपस्थित होते. समुपदेशक रक्षंदा मालुसरे, मयुरेश जाधव, मंदार आंबेरकर, राहुल जाधव, स्नेहल खवळे, प्रथमेश वाडेकर, राजेंद्र भुवड आणि कुणाल शंभरकर या सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
38719
युवराज कारकर
प्रज्ञाशोध परीक्षेत युवराज कारकर द्वितीय
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी या प्रशालेचा विद्यार्थी युवराज कारकर याने ‘अक्षरगंगा प्रज्ञाशोध’ परीक्षेत जिल्ह्यात मानाचा दुसरा क्रमांक मिळवला. मुख्याध्यापिका संजना तारी तसेच दिव्यता नागवेकर, पूनम नाटेकर, पल्लवी शेट्ये, समीक्षा लिंगायत, भाग्यश्री दळवी या शिक्षकांनी त्याला मार्गदर्शन केले. सकाळ-संध्याकाळ जादा वेळ देऊन जादाचे मार्गदर्शन केले. शिक्षकांचे मार्गदर्शन व युवराजची चिकाटी याचे फलित त्याच्या यशात आहे. त्याला मिळालेल्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
शिवाजीनगर येथे २६ला हिंदू संमेलन
रत्नागिरी : शहराजवळील छत्रपती शिवाजीनगर परिसरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन केले आहे. २६ एप्रिलला सायंकाळी ५ ते ७ या वेळेत नगरपालिका वसाहत येथील श्री जय हनुमान मंदिरातील जागेत हे संमेलन होणार आहे. संमेलनात हिंदुत्व, हिंदू समाजासमोरील सध्याची आव्हाने तसेच पंचपरिवर्तन या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
38752
‘नारीशक्ती’ला विरोध करणाऱ्यांचा निषेध
मंडणगड ः संसदेतील नारीशक्ती विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांच्या भूमिकेचा निषेध करत शिवसेना महिला आघाडीच्यावतीने आज मंडणगड शहरातील मुख्य चौकात आंदोलन करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, सभापती प्रणाली चिले, माजी सभापती अमिता शिंदे, नगरसेविका प्रमिला किंजळे आणि संपदा भगत यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या. महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांविरोधात निषेध व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.