

- rat२१p२२.jpg-
26O38773
खेड ः कळंबणीनजीक महामार्गावरील अपघातग्रस्त मोटार.
----------
टपरी, घरामध्ये घुसली मोटार
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २१ : मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयासमोरील एका टपरीसह घरामध्ये भरधाव वेगातील मोटार घुसली. यामध्ये मोटारीसह दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
हा अपघात मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गालगत असणाऱ्या टपरीवजा हॉटेलसह घरात गाडी शिरल्याने एकच गोंधळ उडाला होता. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने, दैव बलवत्तर म्हणून या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. या अपघाताचा अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.