गरजूविद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा आर्थिक आधार

गरजूविद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा आर्थिक आधार
Published on

- rat२२p१०.jpg-
26O38902
मंडणगड : विद्यार्थ्यांना आर्थिक मदत वितरित करताना कोषाध्यक्ष रवींद्रकुमार मिश्रा, संचालक आदेश मर्चंडे, प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मीक परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये व अन्य मान्यवर.

गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य
मुंडे महाविद्यालयाचा उपक्रम ; १९ जणांना आधार
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २२ ः सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि कर्मवीर भि. रा. दादा इदाते कनिष्ठ महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थ्यांना ‘महाविद्यालय विद्यार्थी सहाय्यता निधी’रतून आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले.
महाविद्यालयात दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला जातो. यावर्षी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील एकूण १९ पात्र विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना हा निधी सुपूर्द करण्यात आला. विद्यार्थ्यांनी कौटुंबिक व आर्थिक अडचणींवर मात करून आपले शिक्षण जिद्दीने पूर्ण करावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मीक परहर यांनी अध्यक्षीय भाषणात नमूद केले.
संस्थेचे संचालक आदेश मर्चंडे यांनी संस्थेच्या माध्यमातून मिळणारी ही मदत केवळ आर्थिक नसून ते तुमच्या भविष्यासाठी दिलेले एक प्रोत्साहन आहे, असे सांगितले. या प्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष रवींद्रकुमार मिश्रा, उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. दगडू जगताप, प्रा. महादेव वाघ, प्रा. प्राची कदम आदी उपस्थित होते. डॉ. विष्णू जायभाये यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. अशोक कंठाळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com