

- ratchl२२२.jpg
26O38943
कृष्णराज महाडीक
भाजपचे प्रदेशाध्यक्ष
उद्या रत्नागिरी दौऱ्यावर
चिपळूण, ता. २२ ः भाजपच्या युवामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक शुक्रवारी (ता. २४) आणि शनिवारी (ता. २५) चिपळूण आणि रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामुळे युवा कार्यकर्त्यांना निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी व्यक्त केला.
कृष्णराज महाडिक हे गुहागर येथून दुपारी १२ वा. चिपळुणात येतील. या वेळी उक्ताड येथे त्यांचे स्वागत केले जाणार आहे. वाशिष्ठी डेअरीची पाहणी झाल्यानंतर तेथील सभागृहात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. त्यानंतर महाडिक यांच्या उपस्थितीत चिपळूण येथील शिक्षक पतपेढी सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर युवामोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा होईल. या सभेला महाडिक मार्गदर्शन करणार आहेत. २५ रोजी रत्नागिरीतील भाजपच्या जिल्हा कार्यालयाला भेट देणार आहेत. तिथे युवामोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील, अशी माहिती युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी दिली. या वेळी भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.