आरवली वेतोबा चरणी हजारो भाविक लिन

आरवली वेतोबा चरणी हजारो भाविक लिन
Published on

38960
आरवली : येथील श्री वेतोबा देव.
38961
आरवली : येथील श्री वेतोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.

आरवली वेतोबा चरणी हजारो भाविक लिन

वर्धापनदिन उत्साहात; मंदिर परिसरात चैतन्याचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २२ : प्रति तिरुपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबाचा वर्धापनदिन सोहळा मंगळवारी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात झाला. या उत्सवामुळे मंदिर परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
आरवली येथील वेतोबा  देवस्थानकडून या वर्धापन दिनानिमित्त १९ ते २३ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पाच दिवस भरगच्च कार्यक्रमांमुळे मंदिर परिसर धार्मिक वातावरणाने न्हाऊन निघाला आहे. या उत्सवाची तयारी गेला महिनाभर सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी, गोवा, कर्नाटक, पुणे, मुंबई आदी भागांतून भाविक मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाले. सकाळपासूनच देवदर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या देवाला केळ्याच्या घडांचा प्रसाद देण्याची प्रथा असल्याने मोठ्या प्रमाणात केळ्याच्या घडांची दुकाने सजली होती. भाविकांच्या सोयीसाठी रांगांचे योग्य नियोजन देवस्थानाकडून करण्यात आले होते. तसेच महाप्रसादासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती.
१९ एप्रिलपासून या कार्यक्रमांना प्रारंभ झाला. त्या दिवशी सकाळी धार्मिक कार्यक्रम, रात्री पालखी प्रदक्षिणा आणि त्यानंतर नाईक मोचेमाडकर दशावतारी मंडळाचे दशावतारी नाटक सादर झाले. २० एप्रिल रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी कै. लालजी देसाई संगीत विद्यालय आयोजित अभंग गीत गायन स्पर्धा झाली, तर रात्री पालखी प्रदक्षिणा झाली. २१ एप्रिल रोजी वर्धापनदिन सोहळा सकाळपासून थाटात सुरू झाला. सकाळी धार्मिक पूजा-अर्चा झाल्यानंतर लघुरूद्र, अभिषेक, पूर्णाहुती, बलिदान कार्यक्रम झाले. दुपारी १ वाजता महाआरती करण्यात आली. सर्व भाविकांसाठी महाप्रसाद सुरू झाला. उत्सवानिमित्त झालेल्या या महाआरती आणि महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com