हातिवले टोल नाका २३ मेपासून सुरू होणार 0

हातिवले टोल नाका २३ मेपासून सुरू होणार 0
Published on

हातिवले टोलनाका २३ मेपासून सुरू?
स्थानिकांमध्ये नाराजी ः कामे अपूर्ण, वसुलीला विरोध
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २२ : मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले येथील टोलनाक्यावरील टोल वसुली येत्या २३ मे पासून सुरू करण्यात येणार असल्याचे पुढे आले आहे. महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असतानाच टोल सुरू केले जात असल्याने राजापूर तालुक्यातील स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
टोल संचालनासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत अनेक कंपन्यांनी रस दाखवला आहे. यापैकी काही कंपन्यांच्या प्रतिनिधींनी हातिवले परिसरात प्राथमिक सर्व्हे आणि प्रत्यक्ष जागेची पाहणी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच याबाबतचे अधिकृत आदेश निघण्याची शक्यता आहे. हातिवले टोलनाका सुरू करण्याच्या हालचालींचे पडसाद राजापूर पंचायत समितीच्या मासिक सभेत उमटले. या सभेत सदस्यांनी टोल वसुलीला कडाडून विरोध दर्शवला तसेच, जर टोल सुरू झालाच तर स्थानिक वाहनचालकांना त्यातून पूर्णपणे सवलत देण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण ठराव या सभेत मंजूर करण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे अनेक टप्पे अजूनही अपूर्ण आहेत. अनेक ठिकाणी सर्व्हिस रोडची कामे रखडलेली असून, सुरक्षेच्या समस्याही कायम आहेत. अशा स्थितीत टोल आकारणी करणे अन्यायकारक असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. यापूर्वीही स्थानिकांनी टोलमाफीसाठी लढा दिला होता. आता पुन्हा टोल वसुली सुरू झाल्यास स्थानिक ग्रामस्थांकडून आंदोलन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. टोलवसुलीबाबत प्रशासनाकडून स्पष्टता आल्यानंतर आंदोलनाची दिशा निश्चित करणार असल्याचे हातिवलेतील स्थानिकांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com