चिपळूण ः पवन तलाव मैदानावर हेलिकॉप्टर उतरवण्यास बंदी करा

चिपळूण ः पवन तलाव मैदानावर हेलिकॉप्टर उतरवण्यास बंदी करा
Published on

मैदानावर हेलिकॉप्टर उतरवू नका...
ठाकरे सेनेची मागणी; ‘पवन तलाव’चा दर्जा टिकवा, चिपळूण पालिका सभेत चर्चा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ ः चिपळूण नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पवन तलाव मैदानाच्या संवर्धनाचा मुद्दा चांगलाच गाजला. ठाकरे सेनेचे नगरसेवक विकी नरळकर यांनी आक्रमक भूमिका घेत, मैदानाचा दर्जा टिकवण्यासाठी या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवू नये, असा ठराव करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, या वेळी त्यांनी आमदार शेखर निकम यांनी मैदानाच्या विकासासाठी केलेल्या कामाचे जाहीर कौतुकही केले.
नगरसेवक नरळकर म्हणाले, आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे ‘नागरी स्थानिक स्वराज्य संस्था’ योजनेअंतर्गत मैदानासाठी १ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातून टर्फ विकेट, कॉमेंट्री बॉक्स आणि लाईट पोलसारखी आधुनिक कामे प्रगतिपथावर आहेत. मैदानावर लेदरबॉलच्या स्पर्धा सुरू झाल्या आहेत; मात्र, वारंवार हेलिकॉप्टर उतरल्यामुळे खेळपट्टीचे नुकसान होते आणि स्पर्धांमध्ये अडथळा येतो. त्यामुळे हे मैदान खेळाडूंसाठीच राखीव ठेवावे, असा आग्रह नरळकर त्यांनी धरला.
या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी माहिती दिली की, ‘पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी या विषयावर चर्चा झाली आहे. हेलिपॅडसाठी गोवळकोट मैदान, डीबीजे कॉलेज मैदान किंवा शिवाजीनगर बसस्थानक परिसर या तीन जागांचा विचार सुरू आहे. महिनाभरात जागा निश्चित होताच पवन तलाव मैदानावर हेलिकॉप्टर न उतरवण्याचा अधिकृत ठराव केला जाईल.’
---
क्रीडाप्रेमींकडून निर्णयाचे स्वागत
चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनीही या भूमिकेचे स्वागत केले आहे. हेलिकॉप्टरमुळे मैदानाची हानी होऊन सामने रद्द करावे लागतात त्यामुळे पालिकेने तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com