

rat२३p८.jpg-
26O39105
तनया तावडे
rat२३p९.jpg-
26O39106
शुभ्रा तावडे
‘सिंधुरत्न टॅलेन्ट’मध्ये
शुभ्रा, तनयाचे यश
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २३ : नुकत्याच जाहीर झालेल्या सिंधुरत्न टॅलेन्ट सर्च परीक्षेत जिल्हा परिषद शाळा विलये नं. २ च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. त्यात सहावीतील विद्यार्थिनी शुभ्रा तावडे हिने जिल्हा गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक तर चौथीतील विद्यार्थिनी तनया तावडे हिने जिल्हा गुणवत्ता यादीत नववा क्रमांक पटकावला. शुभ्रा तावडे ही मंथन परीक्षेच्या माध्यमातून जिल्हा गुणवत्ता यादीत आल्याने तिची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.
याचबरोबर तनया तावडे हिने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या मंथन परीक्षेत गुणवत्ता यादीत येताना राज्यात बारावा, जिल्ह्यात सहावा तर राजापूर तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला. गतवर्षी शुभ्रा तावडेने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवता यादीत येण्याचा मान मिळवला होता. त्यांना शाळेचे मुख्याध्यापक झिंबरे, उपशिक्षक संजय बाईत, शाम सारीक यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप तावडे, सरपंच सावली परवडी यांसह ग्रामस्थ, पालक यांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.