

स्थानिक व्यवसायांना डिजिटल पंख
‘अनबॉक्स, क्विकबॉक्स’चा उपक्रम; नोंदणी मोफत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : स्थानिक दुकानदार आणि व्यावसायिकांना ऑनलाइन बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी ‘एनजीओ क्विकबॉक्स’ आणि रत्नागिरीतील ‘अनबॉक्स युअर डिझायर’ने नवा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आता स्थानिक प्रत्येक दुकानदाराला आपली उत्पादने सहजपणे ऑनलाइन विकता येणार आहेत. तसेच क्विकबॉक्सकडून वस्तू घरपोच केल्या जाणार आहेत.
सध्याच्या डिजिटल युगात व्यवसायासाठी ऑनलाइन उपस्थिती अत्यंत महत्त्वाची बनली असून, ‘क्विकबॉक्स’च्या माध्यमातून स्थानिक व्यवसायांना आपली ओळख निर्माण करून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या प्लॅटफॉर्मवर कोणतीही नोंदणी फी किंवा कमिशन आकारले जाणार नसून, व्यापाऱ्यांना आपली उत्पादने जाहिरात करण्याचीही सुविधा मिळणार आहे. आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन उपस्थिती अत्यंत महत्त्वाची झाली आहे. क्विकबॉक्सच्या माध्यमातून स्थानिक व्यावसायिक आपल्या दुकानाचा विस्तार करून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात. याकरिता शॉप ॲक्ट लायसन्स किंवा भाडेकरार, फूड लायसन्स (लागू असल्यास), पॅनकार्ड, बॅंक पासबुक झेरॉक्स किंवा रद्द केलेला धनादेश अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.
या प्लॅटफॉर्मचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सोपा व वापरण्यास सुलभ आहे. त्यामुळे लहान व मध्यम व्यावसायिकांसाठी हा प्लॅटफॉर्म फायदेशीर ठरणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक व्यावसायिकांनी आगाशे एम्पायर, नाचणे-साळवी स्टॉप लिंक रोड, रत्नागिरी येथे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.