

swt2312.jpg
39175
खानोली ः नाट्य महोत्सवाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना विशाल परब. बाजूला प्रसन्ना देसाई व इतर मान्यवर.
लोककलांचे संवर्धन काळाची गरज
विशाल परब ः खानोलीत दशावतार नाट्य महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २३ ः दशावतार आणि पौराणिक नाट्य ही आपली समृद्ध परंपरा आहे. अशा महोत्सवांमुळे ही कला जिवंत राहते आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचते. ग्रामीण भागात अशा उपक्रमांचे आयोजन होणे ही अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन युवा नेते विशाल परब यांनी खानोली येथे नाट्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
खानोली येथे आयोजित पौराणिक नाट्य महोत्सवाचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण आणि पारंपरिक वातावरणात मोठ्या दिमाखात झाला. नाट्यप्रेमी आणि कला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उद्घाटन सोहळ्यास प्रमुख मान्यवर युवा नेते विशाल परब, प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, साईप्रसाद नाईक, शरद चव्हाण, सुनील मयेकर, संतोष सनगरे, बुवा भालचंद्र केळुसकर, सरपंच सुभाष खानोलकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनानंतर सादर करण्यात आलेल्या पौराणिक नाट्यप्रयोगांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कलाकारांच्या दमदार अभिनय, आकर्षक वेशभूषा, प्रभावी नेपथ्य आणि पार्श्वसंगीतामुळे नाटकांना रंगत आली. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे कौतुक केले. महोत्सवाच्या आयोजनात स्थानिक ग्रामस्थ, युवक मंडळे आणि कलाप्रेमींनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण परिसरात शिस्तबद्ध व्यवस्था केली होती. हा महोत्सव स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच पारंपरिक लोककलेच्या जतन आणि संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी श्री. परब यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर अशा उपक्रमांना सहकार्यासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले. प्रा. वैभव खानोलकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अण्णा खानोलकर, विद्याधर प्रभू, मनोहर खानोलकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.