

swt2323.jpg
39211
कुडाळ ः पत्रकार परिषदेत बोलताना मिलिंद नाईक. बाजूला प्रफुल्ल वालावलकर, निखिल कांदळगावकर, काका कुडाळकर. (छायाचित्र ः अजय सावंत)
कुडाळ पंचायत समितीची
सोमवारी मासिक सभा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २३ ः कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा तब्बल सात वर्षांनंतर प्रथमच सोमवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता येथील महालक्ष्मी हॉलमध्ये आमदार नीलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कुडाळ पंचायत समितीच्या २०२५-२६ या वित्तीय वर्षात केलेल्या कामकाजाचा आढावा या आमसभेत घेण्यात येणार आहे. आमसभेसाठी निवेदने रविवार (ता. २६) दुपारपर्यंत स्वीकारली जातील, अशी माहिती पत्रकार परिषदेत सभापती मिलिंद नाईक यांनी दिली.
सभापती नाईक यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, पंचायत समिती सदस्य निखिल कांदळगावकर, काका कुडाळकर, ''उमेद''चे गणेश राठोड आदी उपस्थित होते. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रथमच आमसभा होत आहे. या अगोदरची आमसभा २ मार्च २०१९ मध्ये झाली होती. दरम्यानच्या कालावधीत प्रशासकीय यंत्रणा कार्यरत होती. आमसभेला ज्यांना गावातील विकासकामांवर व इतर निवेदन द्यायची असेल, त्यांनी २६ एप्रिल दुपारपर्यंत ही निवेदने पंचायत समितीत द्यावीत, असे आवाहन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.