कोकणच्या खनिजावर कंपन्यांचा डोळा

कोकणच्या खनिजावर कंपन्यांचा डोळा
Published on

जिल्ह्यात ५० वर्षांसाठी खाणपट्टे मंजूर
मंडणगड, दापोली, राजापूरचा समावेश ः ४५० हेक्टरांत होणार उत्खनन
सकाळ वृत्तसेवा
​रत्नागिरी, ता. २३ : मंडणगड, दापोली आणि राजापूर या ३ तालुक्यांमध्ये प्रमुख कंपन्यांना बॉक्साईट उत्खननासाठी दीर्घकालीन खाणपट्टे मंजूर केले आहेत. विशेष म्हणजे, यातील बहुतांश खाणपट्ट्यांची मुदत आगामी पाच दशकांपपर्यंत म्हणजेच २०५५ ते २०६० पर्यंत असणार आहे. विविध कंपन्यांकडून साडे ४५० हेक्टरात उत्खनन होणार आहे. कोकणच्या खनिजावर बाहेरच्या मोठ्या कंपन्यांचा डोळा आहे. कोकणच्या भूगर्भातील खनिज संपत्तीचा उपसा येत्या काळात मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मंडणगड तालुक्यातील गुढेघर येथे ''मे. इन्फ्रास्ट्रक्चर लॉजिस्टिक'' या कंपनीला ९१.५८ हेक्टर क्षेत्रावर बॉक्साईट उत्खननासाठी मंजुरी मिळाली आहे. या खाणपट्ट्याची मुदत २६ ऑगस्ट २०६० पर्यंत आहे. दापोली तालुक्यात ''मे. आशापुरा माईनकेम लिमिटेड'' या कंपनीला दोन मोठ्या प्रकल्पांसाठी मंजुरी मिळाली आहे. मौजे रोवले येथील २१८.२८ हेक्टर आणि मौजे उंबरशेत येथील ९९.८६ हेक्टर अशा विस्तीर्ण क्षेत्रावर बॉक्साईटचे उत्खनन केले जाणार आहे. या दोन्ही खाणपट्ट्यांची मुदत २०५५ पर्यंत निश्चित केली आहे.
राजापूर तालुक्यातही नाणार आणि हमदरा घोडकेवाडा परिसरात खाणकामाचे नियोजन आहे. हमदारावाडा परिसरातही मोठ्या क्षेत्रावर खनिजाचे साठे आहेत. त्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. खाणपट्ट्यांचे एकूण क्षेत्रफळ आणि कालावधी पाहता, खनिजावर आधारित उद्योगांना मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. राजापूर तालुक्याचा विचार करता ६७३.७२ हेक्टर बॉक्साईटचे उत्खनन होणार आहे.
​या खाणपट्ट्यांमुळे राज्य शासनाच्या तिजोरीत कोट्यवधीचा महसूल जमा होणार आहे; मात्र, हे उत्खनन करताना पर्यावरणाचे नियम पाळले जावेत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. रत्नागिरीच्या खनिज नकाशावर दापोली आणि मंडणगड हे तालुके केंद्रस्थानी आले आहेत.

राजापुरात उत्खननाला विरोध
राजापूर तालुक्यातील नाणार आणि हमदारा घोडकेवाडा येथील जन सुनावणीला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे. स्थानिकांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची भूमिका घेत उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी देखील या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.

तालुकानिहाय होणार लूट

तालुका* गाव* क्षेत्र (हेक्टर) *खनिज मुदत
मंडणगड * गुढेघर *९१.५८ बॉक्साईट *२०६० पर्यंत
दापोली * रोवले *२१८.२८ बॉक्साईट *२०५५ पर्यंत
दापोली *उंबरशेत *९९.८६ बॉक्साईट*
राजापूर * राजापूर * ६७३.७२ बॉक्साईटचे (प्रस्तावित)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com