राज्यस्तरीय काव्य वाचनमध्ये पोंक्षे यांचे यश

राज्यस्तरीय काव्य वाचनमध्ये पोंक्षे यांचे यश
Published on

- rat२४p४.jpg-
26O39341
वर्षा पोंक्षे

राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत
माखजनच्या वर्षा पोंक्षे तिसऱ्यास्थांनी

साखरपा : शब्दगंध साहित्य परिषदेतर्फे आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत माखजन (ता. संगमेश्वर) येथील प्रथितयश साहित्यिका वर्षा शरद पोंक्षे यांनी तृतीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. नवोदित कवींना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, कवी-कवयित्रींच्या शेकडो कवितांमधून वर्षा पोंक्षे यांच्या कवितेची निवड करण्यात आली. कवयित्री शर्मिला गोसावी, ज्येष्ठ पत्रकार मकरंद घोडके आणि राजेंद्र फंड यांच्या त्रिसदस्यीय समितीने या स्पर्धेचे परीक्षण केले. पुढील महिन्यात २३ आणि २४ तारखेला अहिल्यानगर येथे शब्दगंध साहित्य परिषदेचे भव्य साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात मान्यवरांच्या हस्ते वर्षा पोंक्षे यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यांच्या या यशामुळे माखजनसह संपूर्ण संगमेश्वर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


-rat२४p५.jpg-
26O39342
साखरपा : कीर्तन सादर करताना मोहक रायकर

गणेश वेद पाठशाळेत शंकराचार्य जयंती साजरी
साखरपा : देवरुख येथील श्री गणेश वेद पाठशाळा येथे आद्य शंकराचार्य जयंती अत्यंत भक्तीमय आणि आनंददायी वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आद्य शंकराचार्य यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. सायंकाळच्या सत्रात डोंबिवली येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार मोहक रायकर यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले. या कीर्तनाला रत्नागिरीतील चैतन्य पटवर्धन यांनी हार्मोनियमवर, तर केदार लिंगायत यांनी तबल्यावर उत्तम साथसंगत केली. या उत्सवासाठी देवरुख परिसरातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तनानंतर उपस्थितांसाठी ‘खिचडी’ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध वातावरणात पार पडला, ज्यामुळे परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com