

swt243.jpg
39411
कट्टा : महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवर.
महात्मा फुले द्विजन्मशताब्दी
वर्षानिमित्त विविध उपक्रम
बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे कट्टा येथे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २४ : मालवण तालुक्यातील बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्यावतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सेवांगणचे विश्वस्त दोपक भोगटे यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवन कार्याची ओळख करून दिली. बॅ नाथ पै सेवांगण नेहमीच महिलांसाठी अनेक उपक्रम राबवते आज गरजू महिलांसाठी नवीन मोफत शिवण वर्गाचा प्रारंभ होत आहे. ही महात्मा फुले यांना आदरांजलीच आहे, असे भोगटे म्हणाले. हा शिवणवर्ग साक्षी अमरे अत्यंत जबाबदारीने व आपुलकीने सांभाळत असल्याने त्यांना त्यांनी धन्यवाद दिले.
यावेळी विशाखा आपटे, रसिका गावडे, सानिका सावंत यांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी पाककला व वेशभूषा स्पर्धेतील महिलांना प्रशस्तीपत्र भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. शिवणकला पूर्ण केलेल्या महिलाना प्रशस्तीपत्र व भेटवस्त देऊन सन्मान करण्यात आला. शिवणक्लासच्या मुलानी सेवांगणास सिलिंग फॅन भेट दिला. या कार्यक्रमास किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, शोभा म्हाडगुत, दीपक भोगटे, मनोज काळसेकर, मंगल पराडकर, साक्षी अमरे, बाळकृष्ण गोंधळी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.