

-rat२४p१४.jpg-
26O39421
मंडणगड ः गोठे येथील प्रकाश गोविंद जोशी यांच्याकडे घरकुलाची चावी सुपूर्द करताना ग्रामपंचायत अधिकारी दीपक टेमकर.
----
घरकुलांची स्वप्ने अडथळ्यांमध्ये अडकली
मंडणगड तालुका ; मजुरांची टंचाई अन् स्थलांतराचा फटका, मात्र आदिवासी योजनेत सकारात्मक चित्र
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २४ ः तालुक्यात प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत मंजूर १३४१ घरांपैकी केवळ २९५ घरे पूर्ण झाली असून, नवीन ऑनलाइन ‘स्पर्श’ प्रणालीमुळे हप्ते वितरणास होणारा विलंब, लाभार्थ्यांचे स्थलांतर आणि मजुरांची कमतरता यामुळे बांधकामाचा वेग मंदावला आहे. दुसरीकडे, आदिवासी घरकुल योजनेत प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे तुलनेने चांगली प्रगती दिसून येत असून मंजूर १३८ घरांपैकी १०३ घरे पूर्ण झाली आहेत.
प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक अडथळे येत आहेत. लाभार्थी रोजगारासाठी बाहेरगावी वास्तव्यास असल्याने बांधकामासाठी वेळ देऊ शकत नाहीत. तसेच ग्रामीण भागात बांधकाम मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मंजूर घरांचे काम रखडल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू असला तरी योजनांना गती देण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे.
* ग्रामपंचायतींची उल्लेखनीय कामगिरी
तालुक्यातील घरकुल योजनांच्या एकूण पार्श्वभूमीवर काही ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय कामगिरी करत सकारात्मक उदाहरण निर्माण केले आहे. गोठे ग्रामपंचायतीने मंजूर २४ घरकुलांपैकी १६ घरे पूर्ण केली असून उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. तसेच तोंडली ग्रामपंचायतीनेही २२ पैकी १७ घरकुल पूर्ण करून प्रभावी अंमलबजावणी दाखवून दिली आहे. तसेच अडखळ ग्रामपंचायतीत ५६ पैकी ५१ घरकुल पूर्ण करण्यात आली आहेत. या तिन्ही ग्रामपंचायतींनी सातत्यपूर्ण पाठपुरावा, स्थानिक स्तरावरील समन्वय आणि नियोजनाच्या जोरावर घरकुल बांधकामांना गती दिली आहे. त्यामुळे अडचणींच्या परिस्थितीतही योग्य नियोजन केल्यास उद्दिष्टपूर्ती साध्य होऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
*घरकुल योजनांची आकडेवारी
प्रधानमंत्री घरकुल योजना
मंजूर घरे : १३४१
पूर्ण घरे : २९५
*हफ्त्यांचे वितरण
पहिला हप्ता : १२८६ लाभार्थी
दुसरा हप्ता : ८६६
तिसरा हप्ता : ६७४
चौथा हप्ता : १३१
* प्रति घर अनुदान : १.२० लाख + वाढीव ३५ हजार
-----
*आदिवासी घरकुल योजना
मंजूर घरे : १३८
पूर्ण घरे : १०३
प्रति घर अनुदान : २.५० लाख
-------
*मुख्य अडचणी
ऑनलाइन स्पर्श प्रणालीमुळे हप्ते विलंबाने मिळणे
लाभार्थ्यांचे स्थलांतर
बांधकाम मजुरांचा अभाव
स्थानिक स्तरावरील समन्वयाचा अभाव
-----
ग्रामपंचायतींची उल्लेखनीय कामगिरी
गोठे ग्रामपंचायत : २४ पैकी १६ घरे पूर्ण
तोंडली ग्रामपंचायत : २२ पैकी १७ घरे पूर्ण
अडखळ ग्रामपंचायत : ५६ पैकी ५१ घरे पूर्ण
--------------
कोट
मंडणगड तालुक्यात घरकुल योजनांची अंमलबजावणी करताना काही व्यावहारिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थलांतरित होणारे लाभार्थी, मजूर टंचाई तसेच लाभार्थ्यांकडे वेळेअभावी बांधकाम कामांची गती अपेक्षित प्रमाणात साधता येत नाही. तथापि, प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय, ऑनलाईन प्रणालीमुळे प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ लागत आहे, ज्याचा परिणाम कामांच्या गतीवर होत आहे
---महेश वाघ, कनिष्ठ सहाय्यक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.