भगवतीनगर सरपंचपदी पुन्हा प्रगती भोसले

भगवतीनगर सरपंचपदी पुन्हा प्रगती भोसले
Published on

भगवतीनगर सरपंचपदी पुन्हा भोसले
न्यायलयीन लढाईत यश ; कर्तव्यात कसूर केल्याचा होता आरोप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : तालुक्यातील भगवती नगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच प्रगती भोसले यांनी प्रशासकीय आणि राजकीय संघर्षावर मात करत अखेर न्यायालयीन लढाईत विजय मिळवला आहे. त्या पुन्हा सरपंच पदावर विराजमान झाल्या आहेत. अन्यायकारक कारवाईमुळे पदावरून दूर करण्यात आल्यानंतर त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करत आपले हक्काचे पद पुन्हा मिळवले आहे.
भोसले यांच्यावर प्रशासकीय अनियमितता व कर्तव्यात कसूर केल्याचे आरोप ठेवत त्यांना पदावरून हटवण्यात आले होते. मात्र, या निर्णयाला त्यांनी न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयीन प्रक्रियेत सर्व आरोप खोडून काढत त्यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली आणि अखेर त्यांना न्याय मिळाला. विरोधी पक्षातून निवडून आल्यामुळे राजकीय द्वेषातून त्यांना दोनवेळा पदावरून हटवण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला. महिला सन्मानाच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडूनच महिला लोकप्रतिनिधींना अडचणीत आणले जात असल्याची टीका करण्यात आली. मात्र, खचून न जाता भोसले यांनी न्यायालयावर विश्वास ठेवत लढा सुरू ठेवला आणि सन्मानाने पुनर्पदग्रहण केले. पुनर्पदग्रहण सोहळ्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, उपतालुकाप्रमुख प्रकाश जाधव, सुभाष रहाटे, तसेच विभागप्रमुख उत्तम मोरे उपस्थित होते.
न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरही प्रशासनाकडून आदेश देण्यात विलंब होत होता. ही बाब जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा संघटक संतोष थेराडे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावला. यावेळी बोलताना सौ. भोसले यांनी, जनतेने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरत विकासकामांना गती देऊ, असा विश्वास व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com