

-rat२४p१३.jpg-
26O39420
राजापूर ः कळसवली ग्रामपंचायतीच्यावतीने घरोघरी बारकोड बसविताना सरपंच देवेश तळेकर.
----
काही सुखद----लोगो
‘डिजिटल नेमप्लेट’ देणार आता घरबसल्या सुविधा
कळसवली ग्रामपंचायतीचा उपक्रम : करभरणासह विविध दाखलेही घरपोच
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २४ : तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीने प्रशासकीय कारभारामध्ये प्रारदर्शकतता आणताना ग्रामपंचायतीने घरोघरी डिजिटल नेमप्लेट वा बारकोड बसवून डिजिटल प्रशासकीय सेवा कारभाराचीही सुरूवात केली आहे. या डिजिटल नेमप्लेट वा बारकोडच्या माध्यमातून गावकऱ्यांना एका स्कॅनवर आपल्या मिळकतींसह विविध करांची सविस्तर माहिती घरबसल्या मिळणार आहेत. तसेच ऑनलाईन करभरणा करताना विविध दाखलेही मिळविता येणार आहेत. घरबसल्या सेवा आणि माहिती उपलब्ध करून देणारी कळसवली ग्रामपंचायत राजापूर तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
दरवर्षी केली जाणारी कर आकारणी आणि त्याद्वारे संकलित होणारा महसूल ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा हक्काचा स्त्रोत असल्याने शंभर टक्के कर वसुली करण्यावर भर दिला जातो. ही घरपट्टी, पाणीपट्टी वा मालमत्ता करांसह अन्य करांची वसुली करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना घरोघरी जावे लागते. दाखल्यांसाठी नागरिकांना ग्रामपंचायतीत फेऱ्या माराव्या लागतात. हे कमी करण्यासाठी कळसवली ग्रामपंचायतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतीच्यावतीने घरोघरी नेमप्लेट वा बारकोड स्कॅनर बसविले आहेत. बारकोडला स्कॅन करताच त्या-त्या व्यक्तीला आपापल्या नावे असलेली नोंदीत मालमत्ता, विविध प्रकारच्या करांची माहिती ऑनलाईन मिळणार आहे. करभरणाही ऑनलाईन पद्धतीने करताना त्याची पावतीही लगेच मिळणार आहे. विविध प्रशासकीय कामांसाठी लागणार दाखल्यांची ऑनलाईन पद्धतीने मागणी नोंदणी करताच दाखलेही ऑनलाईन मिळणार आहेत.
---
दृष्टिक्षेपात...
कळसवली ग्रामपंचायत
* क्षेत्रफळ ः १०.०६ हेक्टर
* लोकसंख्या ः १ हजार ५६५
* घरोघरी बसविलेले बारकोड वा स्कॅनर ः ७१६
----------
डिजिटल नेमप्लेट वा बारकोडद्वारे मिळणाऱ्या सुविधा
* विविध करांचे तपशील
* ऑनलाईन पद्धतीने करभरणा करता येणार
* करभरणा डिजिटल पावती
* मिळकतींची सविस्तर माहिती
* कुटुंबाची सविस्तर माहिती
* ग्रामपंचायतीद्वारे देण्यात येणारे विविध दाखले
----
कोट ः
कळसवली ग्रामपंचायतीने घरोघरी डिजिटल नेमप्लेट वा बारकोड बसवित ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कारभारांमध्ये आधुनिक प्रणालीचा अवलंब केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना एका स्कॅनवर विविध करांची सविस्तर माहिती घरबसल्या मिळणार आहेत. घरात बसूनच ऑनलाईन पद्धतीने दाखलेही मिळवता येणार आहेत. या उपक्रमामध्ये ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांसह प्रशासन आणि ग्रामस्थांचे महत्त्वपूर्ण सहकार्य राहीले आहे.
----देवेश तळेकर, सरपंच, कळसवली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.