​सावंतवाडीत २१ मेपासून ''शिवकालीन मर्दानी खेळ''

​सावंतवाडीत २१ मेपासून ''शिवकालीन मर्दानी खेळ''
Published on

​सावंतवाडीत २१ मेपासून
‘शिवकालीन मर्दानी खेळ’
प्रशिक्षण शिबिर : सहभागाचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
​सावंतवाडी, ता. २४ : सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान (सिंधुदुर्ग विभाग) आणि राष्ट्रवीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे ''शिवकालीन मर्दानी खेळांचे'' भव्य प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. २१ ते २८ मे या कालावधीत सकाळी ७ ते १० या वेळेत हे शिबीर पार पडणार आहे.
​या शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांचे वय किमान ८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. सावंतवाडी परिसरातील (सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित) शाळा व महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना या प्रशिक्षणात प्राधान्य दिले जाणार आहे. या शिबिराचे सविस्तर वेळापत्रक लवकरच घोषित करण्यात येईल, असे आयोजकांतर्फे कळवले आहे. शिवकालीन युद्धकलेचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने हे शिबिर आहे. प्रत्येक प्रशिक्षणार्थीला सरावासाठी स्वतंत्र काठी दिली जाणार आहे. राष्ट्रवीर संघाचे आशिष खैरे हे या शिबिरात प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. हे शिबीर सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. सहभागी होऊ इच्छीणाऱ्यांनी १० मेपर्यंत नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. नावनोंदणीसाठी नाव, गाव, वय आणि संपर्क क्रमांक खालील सदस्यांकडे व्हॉट्सॲपवर पाठवावा. अधिक माहितीसाठी एकनाथ गुरव, ​संपदा राणे व ​प्रमोद मगर यांना संपर्क साधावा.
​आपल्या जाज्वल्य इतिहासातील मर्दानी खेळांचे प्रशिक्षण घेण्याची ही सुवर्णसंधी असून, जास्तीत जास्त युवकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com