१५ मे रोजी आयोजन ; उद्धव ठाकरेंचा पाठिंबा

१५ मे रोजी आयोजन ; उद्धव ठाकरेंचा पाठिंबा
Published on

लोगो
हेक्टरी २२ हजार भरपाई

आंबा बागायतदारांचा ‘वर्षा’वर मोर्चा
१५ मे रोजी आयोजन : उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : गेल्या दोन महिन्यांपासून मदतीसाठी साकडे घालणाऱ्या कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी राज्य सरकारने हेक्टरी केवळ २२ हजार रुपये टाकून त्यांची थट्टा केली आहे. सरकारच्या या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि हक्काची मदत मिळवण्यासाठी १५ मे रोजी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ''वर्षा'' बंगल्यापर्यंत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरून सरकारला गुडघे टेकायला भाग पाडतील, अशी ठाम भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे म्हणाले, ‘ गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच कोकणातील आंबा बागायतदार इतक्या मोठ्या संकटात सापडला असून त्याला रस्त्यावर उतरावे लागले आहे. एकीकडे सरकार उद्योगपतींची कर्जे माफ करण्यात धन्यता मानत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे.’
या धडक मोर्चाचे नियोजन करण्यासाठी झालेल्या बैठकीत १५ मे रोजी दुपारी ४ वाजता गिरगाव चौपाटी येथून आंदोलनाला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, या आंदोलनात शिवसेनेसोबतच मनसे, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या बैठकीस खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, वैभव नाईक, बाळ माने यांच्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोट
आंबा, काजू आणि मत्स्य शेती हा कोकणचा कणा असून, आज हे तिन्ही घटक अडचणीत आहेत. मोहोर गळती, अवकाळी पाऊस, हवामानातील बदल आणि फळमाशीचा प्रादुर्भाव यामुळे आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र कृषी आणि फलोत्पादन विभागाच्या उपाययोजना केवळ कागदावरच मर्यादित राहिल्या आहेत.
- उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com